Sunday, September 13, 2020

३५ बेडचे कोव्हिडं सेंटरची उभारणी













अंकलखोप ( या. पलुस) येथे ३५ बेडचे कोविंड केअर सेंटरचा शुभारंभ पलूसचे गटविकास अधिकारी राहुल रोकडे, राजेश चौगुले, सरपंच अनिल विभूते, डॉ.विश्वास धेंडे, यांच्या उपस्थितीत करण्यात आला. श्री.दत्त सेवाभावी मंडळ औदुंबर च्या सहकार्याने ग्रामपंचायत अंकलखोप, व  राजेश चौगुले फाउंडेशने सुरू केलेले पहिले मोठे कोविंड केअर सेंटर आहे. 
     अंकलखोप व परिसरामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने व सध्य स्थितीला अंकलखोप येथेही ९४ पेक्षा जास्त कोरोना बाधित रुग्ण असल्याने अंकलखोप मध्ये गंभीर वातावरण निर्माण झाले आहे. सध्या सांगली जिल्ह्यातील जवळजवळ सर्वच गावामध्ये कोरोना बाधित रुग्ण आढळत आहेत.‌ परिणामी जिल्ह्यामध्ये उपलब्ध असलेल्या कोव्हिडं सेंटर मध्ये रुग्णांना बेड मिळेनासे झाले आहे. परिणामी कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. याचे गांभीर्य ओळखून श्री.दत्त सेवाभावी मंडळ औदुंबर, अंकलखोप ग्रामपंचायत, राजेश चौगुले फाउंडेशन, तसेच अंकलखोप येथिल लोकांच्या लोकसहभागातून क्लेरमाँन्ट इंटरनॅशनल स्कूल अंकलखोप येथे कोव्हिडं सेंटरची उभारणी केली आहे. त्याचा शुभारंभ पलूसचे गटविकास अधिकारी राहुल रोकडे, राजेश चौगुले, सरपंच अनिल विभूते, डॉ.विश्वास धेंडे, यांच्या उपस्थितीत करण्यात आला. या कोव्हिडं सेंटरच्या माध्यमातून अंकलखोप गावामधील ज्या कोरोना बाधित रुग्णांच्या घरी होम आयसोलेशन करण्याची सोय नाही. अशा रुग्णावरती उपचार करण्यात येणार आहेत. यासाठी डॉ. उमेश चौगुले, इंद्रजीत सुर्यवंशी. विजय पाटील, ए. के. चौगुले, एस. के. चौगुले, विकास सुर्यवंशी, सत्यजित पाटील, राजेंद्र कुंभार, अरविंद सुर्यवंशी, यांनी हे सेंटर होण्यासाठी प्रयत्न केले. यावेळी श्री.दत्त सेवाभावी मंडळाचे अध्यक्ष दिपक सुर्यवंशी, उपाध्यक्ष अमर पाटील, सचिव धनंजय सुर्यवंशी, महेश चौगुले, सह सर्व सदस्य, देवस्थानाचे पुजारी पी. एच. जोशी, कर्मचारी उपस्थित होते.